Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वालावलमध्ये झाला स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेचा लॉंचिंग सोहळा

वालावलमध्ये झाला स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेचा लॉंचिंग सोहळा

'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिका २८ एप्रिल पासून सुरू

गाऱ्हाणे घालून मालिकेचा शुभारंभ

कुडाळ : ‘बा लक्ष्मीनारायणा आणि रवळनाथा तू मागणं घेण्यास राजी हस तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा…तर देवा महाराजा आमच्या नव्या मालिकेसाठी आणि प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आम्ही कलाकारांनी जो काय घाट घातलेला हा, जी काय मेहनत घेतलेली असा ती मेहनत फळाक येवोन सगळ्यांच्या पसंतीस उतरान दे रे म्हाराजा.’ लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी घातलेल्या गाऱ्हाण्याचा नाद संपूर्ण वालावल नगरीत दुमदुमला. निमित्त होतं ते 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेच्या लॉन्च सोहळ्याचं. वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात हा लॉंचिंग सोहळा संपन्न झाला.
या मालिकेचं बरचसं शूटिंग कोकणातल्या कुडाळमध्ये होणार आहे. वालावल मंदिर, निवतीचा समुद्र किनारा अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली बरीचशी प्रेक्षणीय स्थळं मालिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेची गोष्ट कोकणात घडत असल्यामुळे शूटिंगचा श्रीगणेशा आणि लॉन्चिंग सोहळा देखिल या देवभूमीत करण्यात आला.


याप्रसंगी सुकन्या कुलकर्णी, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, अमृता माळवदकर, अमित खेडेकर, संजय शेजवळ आणि स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे उपस्थित होते.
अलोट जनसमुदायाच्या साक्षीने वालावल मंदिरात लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकण म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर येतो तो दशावताराचा खेळ. त्यामुळेच कोण होतीस तू, काय झालीस तू च्या लॉन्च सोहळ्यातील संयुक्त दशावतराच्या खेळाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते या मालिकेतील 'कावेरी' म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने सादर केलेला लाठीकाठीचा खेळ. दोन महिन्यांपासूनची गिरीजाची ही मेहनत एक वेगळीच ऊर्जा देऊन गेली.


याप्रसंगी सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, ‘मी अतिशय भाराऊन गेली आहे. नाटक आणि सिनेमा पहाण्यासाठी हमखास गर्दी होतेच. पण मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला ३००० पेक्षा जास्त चाहते उपस्थित होते हे पाहून खूप छान वाटलं. कोकणातली माणसं फणसासारखी असतात. वरुन काटेरी मात्र आतून तितकीच गोड. या मालिकेत मी साकारात असलेली सुलक्षणा धर्माधिकारी देखिल अशीच फणसासारखी असणार आहे. आजवर माझं हे रुप प्रेक्षकांनी पाहिलेलं नाहीय. त्यामुळे मला हे पात्र साकारताना मज्जा येतेय.’


या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराची कोकणाशी नाळ जोडलेली आहे. मालिकेच्या कथानकाविषयी देखिल उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू ही मालिका सोमवार २८ एप्रिल पासून रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. अशी माहिती स्टार प्रवाहाच्या सोनाली शिवगण यांनी दिली.

rapan bottom