Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या

आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या

आचरा बंदर परिसरातील मच्छी विक्रेत्यांना आचरा ते कणकवली वाहतूक सुविधेअभावी आर्थिक फटका!

आवश्यक त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून एसटी बस मधून मच्छी वाहतुकीस परवानगी मिळावी

सरपंच जेरोण फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्राप सदस्य चावल मुजावर व मच्छीविक्रेत्या महिला यांनी कणकवली विभाग नियंत्रक यांचे वेधले लक्ष



शानू वालावलकर | मालवण | प्रतिनिधी : मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आचरा बंदर परिसरातील मच्छी विक्रेत्यांना मच्छी विक्रीसाठी कणकवली येथे जाण्यास पुरेशी वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी मच्छी विक्रीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, विक्रेत्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसमधून मच्छी वाहतूक करण्यास आवश्यक अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.


यासंदर्भात आचरा ग्रामपंचायतीचे सरपंच जेरोण फर्नांडिस यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कणकवली विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले आहे. देण्यात आलेल्या या निवेदनात मच्छी विक्रेत्यांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत.

आचरा बंदर परिसरातील अनेक मच्छी विक्रेते आपल्या उदरनिर्वाहासाठी मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. या विक्रेत्यांना मच्छी विक्रीसाठी आचरा बंदर येथून कणकवली येथे जावे लागते. मात्र, मच्छी वाहतुकीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे व्यवसायावर परिणाम होत असून, मच्छी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे.

या समस्येवर उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसमधून मच्छी वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मच्छी विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मच्छी कणकवली येथे घेऊन जाण्यास आवश्यक त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी, अशी विनंती ग्रामपंचायतीने केली आहे.

प्रवाशांना त्रास होणार नाही, स्वच्छतेची काळजी घेणार!

प्रवासी बसमधून मच्छी वाहतूक करताना इतर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, बसमधील स्वच्छता राखली जाईल तसेच मच्छी सुरक्षितपणे वाहून नेता येईल, यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायाची गरज आणि प्रवाशांची सोय या दोन्ही बाबींचा विचार करून महामंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आंदोलनाची वेळ येऊ नये; ग्रामपंचायतीची विनंती

मच्छी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित या प्रश्नावर महामंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. मच्छी विक्रेत्यांना आंदोलन छेडण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांची मागणी मान्य करण्यात यावी, अशी विनंती आचरा ग्रामपंचायतीने केली आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांनाही देण्यात आली आहे. मच्छी विक्रेत्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून परिवहन महामंडळ कोणता निर्णय घेते, याकडे आचरा परिसरातील मच्छी विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी सरपंच जेरोण फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, माजी उपसभापती अशोक बागवे, मच्छि विक्रेत्या महिला विशाखा खवणेकर, छाया पराडकर, मनस्वी तोडणकर, गौरी सारंग, दिक्षा जोशी, सुवर्णा पराडकर, विमल बापर्डेकर, सुचिता तोडणकर, मिनल धुरी, माधूरी सारंग आदी उपस्थित होत्या.

ruchira top