Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!

जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!

श्री ईस्वटी महापुरुष मंदिरासाठी सुमारे २०० ताटे-वाट्या यांची भेट

मालवण | प्रतिनिधी :
सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य करत जनसेवेचा वसा जपणारे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिरासाठी सुमारे २०० ताटे व वाट्या भेटस्वरूपात दिल्या. कोजागरी पौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या या भेटीमुळे भाविकांच्या प्रसाद व्यवस्थेसाठी मोलाची मदत झाली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक करत आभार मानले.
देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक विधी, ब्राह्मण भोजन तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने प्रसाद वितरणासाठी आवश्यक असलेल्या ताटे व वाट्यांची गरज लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सुमारे २०० ताटे व वाट्या मंदिराला भेट दिल्या. धार्मिक स्थळांच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करण्याच्या त्यांच्या या कृतीतून सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडले.

जनतेची सेवा हेच पहिले कर्तव्य!

समाजातील विविध घटकांना मदत करणे, धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सहकार्य करणे आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे, या भूमिकेतून दीपक पाटकर सातत्याने कार्यरत आहेत. पदाला केवळ प्रतिष्ठेचे साधन न मानता जनतेच्या सेवेसाठी मिळालेली जबाबदारी म्हणून ते काम करतात, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नागरिकांनी त्यांचे आभार मानून सत्कार केला.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष दीपक पाटकर म्हणाले की, 'जनतेची सेवा हेच आपले पहिले कर्तव्य आहे. हीच शिकवण आम्हाला खासदार नारायण राणे साहेबांकडून मिळाली आहे. त्याच विचाराने काम करताना आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध आहोत.” जनतेच्या विश्वासाला पात्र राहून शहराच्या विकासासोबतच सामाजिक व धार्मिक कार्यातही योगदान देण्याचा आपला प्रयत्न कायमच राहणार असल्याचे दिपक पाटकर यांनी स्पष्ट केले.

पुणे येथे आयोजित रील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे मालवण येथील प्रख्यात रीलस्टार सिद्धेश चव्हाण यांचा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते विशेष सत्कार कार्यक्रम निमित्ताने करण्यात आला. स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सिद्धेश चव्हाण यांच्या कामगिरीचे यावेळी कौतुक करण्यात आले.


यावेळी नगरसेविका निना मुंबरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, गणेश परब यांसह श्री ईस्वटी महापुरुष मंडळ येथील राजन (बाबू) बगाड, राजू किर, महेश दाभोलकर, अमित बोर्डवेकर, शामा आजगावकर, रुपेश कोकरे, अर्जुन चव्हाण, विनायक खानोलकर, संजय खानोलकर, सुरेश खानोलकर, दर्शन मुंबरकर, प्रशांत माणगांवकर, निलेश चव्हाण, सिद्धेश चव्हाण, नितेश मोरये, प्रकाश माणगावकर, अमोल कामतेकर, भूषण मुंबरकर, हरेश मुंबरकर, तेजस मुंबरकर, गौरव सोनवडेकर, रुद्र खानोलकर, प्रणव चव्हाण, हार्दिक दाभोलकर, जेनील आजगावकर, जयेश लुडबे, नंदन लुडबे, माहिका आजगावकर, मधुकर आजगावकर, दिगंबर बगाड, गणेश मुंबरकर, माधुरी दाभोलकर, संगीता लुडबे, विद्या खानोलकर, ज्योतीप्रकाश माणगावकर, अनिता मुंबरकर, शैलजा मुंबरकर, रूपा दाभोलकर, विजया किर, कुंदा पवार, सायली आजगावकर, सुष्मा मुंबरकर, कल्पिता आजगावकर, अश्विनी चव्हाण, साक्षी चव्हाण, नंदा सोनवडेकर, शांती मुंबरकर आणि संगीता चव्हाण यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
धार्मिक कार्याला मदतीचा हात, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि स्थानिक कलागुणांचा गौरव अशा विविध माध्यमांतून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी जनसेवेप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध झाले आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top