Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य

लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य

डॉ. रुपाली पंतवालावलकर यांचे सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक महाविद्यालयातील छात्राध्यापकांना मार्गदर्शन

मालवण, प्रतिनिधी : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब मालवणच्या वतीने सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक महाविद्यालय, कन्याशाळा, धुरीवाडा, मालवण येथे प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांसाठी मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. रुपाली पंतवालावलकर यांनी छात्राध्यापकांना मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यास, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव यांचा समतोल राखताना मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक ताणतणाव ओळखणे, त्यावर योग्य उपाययोजना करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे याविषयी डॉ. रुपाली पंतवालावलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्राध्यापक नागेश कदम, प्राध्यापक रमेश वळवी, प्रा. केळुस्कर आणि प्राध्यापिका सौ. आनंदी घोगळे उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, मुकेश बावकर, रुजरीओ पिंटो, वैशाली शंकादास, उमेश शिरोडकर यांच्यासह लायन्स क्लबचे अन्य सदस्य उपस्थित होते.

मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देणे, हा या मार्गदर्शन कार्यक्रमाचा उद्देश होता.

ruchira top