Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..

पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..


देवगड | सिंधुदुर्ग :- देवगड बीच परिसरात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी कठोर कारवाई केली. सकाळी साधारण १० ते ११ वाजता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगडची ‘स्वामीराज’ (IND-MH-५-MM-५२४८) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली. काही अन्य पर्ससीन नौका अधिकाऱ्यांना पाहताच पळ काढल्या.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी देवगड किरण वाघमारे यांनी पोलिस प्रशासन व सुरक्षा रक्षकांच्या मदतीने राबविली. देवगड समोर केवळ ३ ते ४ वाव पाण्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ च्या स्पष्ट तरतुदींचे उल्लंघन करत अवैध पर्ससीन मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली.

‘स्वामीराज’ नौकेची कसून तपासणी केली असता एकूण २६ परप्रांतीय खलाशी आढळून आले. कायद्यानुसार परवानगी असलेल्या १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारी करण्यासाठी एक्सेस पास असतानाही या नौका किनारी भागात अवैध पद्धतीने मासेमारी करत असल्याची तक्रार होती. या कारवाईतून त्याची पुष्टी झाली आहे. नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली असून अधिनियमांतर्गत तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी या कार्यवाहीचे स्वागत केले असून प्रशासनाने नियमित पाळत ठेवून कठोर अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने आता किनारी भागात नियमित गस्त वाढवून अवैध मासेमारी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारीचे हितसंबंध जपले जातील आणि सागरी संसाधनांचे संवर्धन होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ruchira top