Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड

भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड

महाराष्ट्रातील २५ युवा प्रतिनिधींमध्ये समावेश; राष्ट्रीय स्तरावर करणार कोकणचे प्रतिनिधित्व

मालवण | प्रतिनिधी:-
मालवण येथील भाग्यश्री मांजरेकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ या राष्ट्रीय उपक्रमासाठी त्यांची युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या २५ युवा प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश असून, या उपक्रमात त्यांना कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत ‘माय युवा भारत’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांतील युवा प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होणार असून, युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, परस्पर संवाद वाढवणे आणि विविध क्षेत्रांतील अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भाग्यश्री मांजरेकर या कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमध्ये एलएल.बी. (LL.B.) तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वाटचालीसोबतच सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि युवकांच्या सहभागातून जनजागृती घडवून आणणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सामाजिक जाणीव आणि समाजासाठी योगदान देण्याची तळमळ या गुणांच्या बळावर त्यांना राष्ट्रीय स्तरावरील या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’च्या माध्यमातून भाग्यश्री यांना देशाच्या विविध भागांतून आलेल्या युवकांशी संवाद साधता येणार आहे. तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव जाणून घेण्यासोबतच युवा नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या कॅम्पमधील सहभागामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि सामाजिक कार्याच्या पुढील वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

मालवणमधील एका युवा प्रतिनिधीला राष्ट्रीय स्तरावर कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. भाग्यश्री मांजरेकर यांच्या या निवडीबद्दल मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

ruchira top