Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!

आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!

कट्टा गुरामनगरी काराणेवाडी येथील घटना : एका बंगल्यातून रोख रक्कम व सोन्याचे नाणे लंपास

संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील कट्टा गुरामनगरी येथील काराणेवाडी परिसरातील ‘निसर्ग निवास’ बंगलो प्रोजेक्टमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अज्ञात चोरट्याने एकाच वेळी आठ बंद बंगले फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एका बंगल्यातून सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रोकड व एक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरीस गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर अन्य सात बंगल्यांची कुलपे फोडून आतील साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मालवण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे.
कट्टा गुरामनगरी येथील काराणेवाडी परिसरात ‘निसर्ग निवास’ हा बंगलो प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पातील बहुतांश बंगल्यांचे मालक मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास आहेत. सुट्टीच्या तसेच सणासुदीच्या कालावधीत हे मालक आपल्या बंगल्यांमध्ये वास्तव्यास येत असतात. अन्य वेळी हे बंगले बंद असतात. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आठ बंगल्यांची कुलपे फोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

यातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले ऋषिकेश सुभाष गिरकर यांच्या मालकीच्या ‘आई’ या बंगल्यातून काही रोख रक्कम व एक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरीस गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर अन्य सात बंगले फोडून चोरट्याने आतील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, या बंगल्यांमधून कोणतीही रोकड, मौल्यवान वस्तू अथवा अन्य साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आलेले नाही. या बंगल्यांच्या मालकांमध्ये तारी, कन्याळकर, दळवी, फाटक, मोरे, सावंत व पवार यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, रोकड चोरीस गेलेल्या ‘आई’ बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेराही चोरट्याने फोडल्याचे समोर आले आहे. मात्र, अन्य काही बंगल्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या तपासाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे फॉरेन्सिक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून कसून चौकशी

‘निसर्ग निवास’ बंगलो प्रोजेक्टमध्ये आणखी काही नवीन बंगल्यांची बांधकामे सुरू आहेत. या कामांसाठी काही परप्रांतीय कामगार परिसरात वास्तव्यास आहेत. चोरीची घटना घडली त्या कालावधीत यातील एक कामगार परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून पुढील तपास सुरु असल्याचे मालवण पोलीस ठाणे प्रभारी डीवायएसपी दिपक शेलार यांनी सांगितले.

ruchira top