Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा

कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा

ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा सुविधा कार्यान्वित


मालवण | प्रतिनिधी : वर्षानुवर्षे झोपड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कातकरी कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून दिल्यानंतर आता त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कुंभारमाठ ग्रामपंचायतीने मार्गी लावला आहे. शासनाच्या पीएम जनमन योजनेंतर्गत गावातील २१ कातकरी आदिवासी कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळवून देतानाच ग्रामपंचायतीने स्वनिधीतून सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पाण्यासाठी होणारी या कुटुंबांची पायपीट कमी होणार असून.


कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गेली अनेक वर्षे २१ कातकरी आदिवासी कुटुंबे झोपड्या उभारून वास्तव्यास होती. या कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) योजनेंतर्गत त्यांना घरकुलांचा लाभ मिळवून दिला. मात्र, हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी या कुटुंबांना मोठी पायपीट करावी लागत होती. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे त्यांची गैरसोय होत होती. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना हाती घेतली.

मे २०२६ मध्ये पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाच्या सहकार्याने कातकरी वस्तीत विंधन विहीर खोदण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सौरऊर्जेवर चालणारा स्वयंचलित पंप, पाण्याची टाकी आणि सार्वजनिक नळजोडणीसाठी स्टँड पोस्ट उभारण्यात आले. या सुविधेमुळे वस्तीतील कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या पाणीपुरवठा सुविधेचे लोकार्पण माजी उपसभापती मधुकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीने राबविलेला हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला आहे. सौरऊर्जेचा वापर करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था उभारल्याने पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आदिवासी कुटुंबांची मूलभूत गरज पूर्ण करण्याचा ग्रामपंचायतीचा हा प्रयत्न उल्लेखनीय ठरला आहे.

खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विकासनिधीच्या साहाय्याने कुंभारमाठ गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सरपंच पूनम मनोज वाटेगावकर यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील सर्वसामान्य तसेच वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाणीपुरवठा सुविधेच्या लोकार्पणप्रसंगी सरपंच पूनम मनोज वाटेगावकर, पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर, दिव्या डिचवलकर, अनिता गावकर, सोनाली डिचवलकर, माजी उपसरपंच पंढरीनाथ ऊर्फ बाळा माने यांच्यासह कातकरी आदिवासी वस्तीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

घरकुले आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता कातकरी आदिवासी वसाहतीतील उर्वरित मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायतीने पुढील नियोजन केले आहे. महावितरणच्या सहकार्याने वसाहतीतील घरांना विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, तसेच संपूर्ण वसाहतीमध्ये पथदिव्यांची व्यवस्था उभारणे, या कामांसाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हक्काचे घर, पिण्याचे पाणी आणि आगामी काळात वीज व पथदिव्यांची सुविधा अशा टप्प्याटप्प्याने विकासकामांची अंमलबजावणी करून कातकरी आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढाकार यांचा समन्वय साधत ग्रामपंचायतीने आदिवासी कुटुंबांच्या जीवनात दिलासा निर्माण करणारा उपक्रम राबविला आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top