Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर!

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर!

घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया व स्वच्छतेच्या आधुनिक उपाययोजनांचा अभ्यास

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रियेसंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी बंगळुरू येथे दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र शासन आणि इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) अंतर्गत इंडियन सॅनिटेशन कोअॅलिशन (ISC) यांच्या मार्गदर्शनाखाली, HSBC यांच्या आर्थिक सहकार्याने व CDD India यांच्या अंमलबजावणीत 'Climate Resilient Coastal Cities (CRCC) Phase 2' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये किनारपट्टीवरील शहरांमधील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची माहिती घेतली जाणार आहे.

या अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, मल अवशेष व्यवस्थापन (Faecal Sludge Management - FSM) आणि सांडपाणी व्यवस्थापन (Solid Waste Management - SWM) या विषयांवर भर देण्यात येणार आहे.

याशिवाय स्वच्छतेसंदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती आणि विविध यशस्वी प्रकल्पांची माहिती अभ्यास दौऱ्यात सहभागी लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळण्याबरोबरच प्रत्यक्ष प्रकल्पांना भेटी देऊन त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मालवण हे महत्त्वाचे किनारपट्टीवरील पर्यटन शहर असल्याने येथील स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरू येथील अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या दौऱ्यातून मिळणाऱ्या अनुभवाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीचा उपयोग मालवण शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी होऊ शकणार आहे. विशेषतः पर्यावरणपूरक उपाययोजना, कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रियेच्या प्रभावी पद्धतींचा अवलंब करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांसह पाणी पुरवठा अभियंता अमोल काटवळ, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, आरोग्य लिपीक मंदार केळुसकर,शहर समन्वयक अनिकेत चव्हाण यांचा दैऱ्यात सहभाग आहे. 

rapan bottom