Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात!

‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात!


मुणगेसमोरील समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारीवर कारवाई; एक मोठी व चार लहान नौकांवर कायद्याचा बडगा!

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेचा प्रभाव; अवैध मासेमारीविरोधात मत्स्यविभागाची मोहीम तीव्र!


मालवण | प्रतिनिधी : अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ मोहिमेंतर्गत देवगड तालुक्यातील मुणगेसमोरील समुद्रात धडक कारवाई करण्यात आली. अवैध पद्धतीने पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या एक मोठी व चार लहान अशा एकूण पाच नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. सुमारे १० ते १२ वाव पाण्यात मासेमारी करत असलेल्या या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
देवगड-मालवणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त मोहीम

बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. देवगड येथील अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि मालवण येथील अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकांनीही या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम पार पडली.

नियमित गस्तीदरम्यान पाच नौकांवर कारवाई

मुणगेसमोरील समुद्रात नियमित गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाला काही नौका संशयास्पदरीत्या मासेमारी करत असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या नौकांची तपासणी केली असता अवैध पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित पाचही नौका ताब्यात घेतल्या.कारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये अल मोहम्मदी-५ RR (IND-MH-५-MM-४४२९), आमिन-१ (IND-MH-५-MM-५४९३), अल-बुराक RR (IND-MH-५-MM-४१६३), फातिमा-२ (IND-MH-५-MM-५१०४) आणि फैजा या नौकांचा समावेश आहे. या सर्व नौकांविरोधात संबंधित कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आली.

मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेमुळे कारवाईला गती

राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरोधात घेतलेल्या कठोर व स्पष्ट भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून सागरी क्षेत्रात नियमित गस्त आणि संयुक्त कारवायांवर भर दिला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी अधिक सतर्क झाले असून, अवैध मासेमारी रोखण्याच्या दृष्टीने विभागाच्या हालचालींना गती मिळाली आहे. स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा कारवाया महत्त्वपूर्ण ठरत असून, विभागाच्या या धडक कारवाईबाबत स्थानिक मच्छीमार समुदायातून समाधान व्यक्त होत आहे.
अवैध मासेमारीविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार!

सागरी मासेमारीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग कटिबद्ध असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही नौकेची गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विभागाने घेतली आहे. अवैध पर्ससीन मासेमारीसह अन्य बेकायदेशीर मासेमारी प्रकारांना आळा घालण्यासाठी समुद्रातील गस्त अधिक प्रभावी करण्यात येत आहे. यापुढेही ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत अशा धडक मोहिमा सुरूच राहणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


▪️अमित खोत | मालवण

rapan bottom