Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय !

वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय !


२२.२४ कोटींच्या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील मत्स्यशेतीला मिळणार चालना ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या दुरदृष्टी पुढाकाराचे स्वागत

गाबीत फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची भूमिका

मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून वेंगुर्ला तालुक्यातील वाघेश्वर (उमादांडा) येथे २२ कोटी २४ लाख रुपये खर्चातून साकारत असलेला बहुजातीय मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प जिल्ह्यातील मत्स्यशेती, रोजगारनिर्मिती आणि किनारपट्टीच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून स्थानिक मच्छीमारांसह युवक व महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास गाबीत फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन करून आभार मानले.

१३६ गावांतील मच्छीमारांना लाभाची संधी


या प्रकल्पांतर्गत कोळंबी, जीताडा, सी बास (तीस), कालव व शिंपले अशा विविध प्रजातींच्या दर्जेदार मत्स्यबीजांचे स्थानिक पातळीवर उत्पादन होणार आहे. जिल्ह्यातील १३६ किनारपट्टीवरील गावांमधील मच्छीमारांसह सुमारे ६ हजार ९४० हेक्टर निमखाऱ्या क्षेत्रातील मत्स्यशेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो. मत्स्यबीज उत्पादन, संगोपन, खाद्यपुरवठा, वाहतूक, पॅकिंग, तांत्रिक सेवा व विपणन क्षेत्रात योग्य नियोजन केल्यास स्थानिक युवक आणि महिला बचत गटांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या शेकडो संधी उपलब्ध होऊ शकतील, असे मोंडकर यांनी सांगितले.

प्रशिक्षण व अनुदानातून ‘नीलक्रांती’ शक्य

जिल्हा नियोजन समिती आणि सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून मच्छीमार, महिला बचत गट व युवकांना प्रशिक्षणासह व्यवसाय उभारणीसाठी शासकीय अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारीवरील अवलंबित्व कमी होऊन मत्स्यशेतीच्या माध्यमातून उत्पन्नाचा शाश्वत पर्याय निर्माण होईल. स्थानिक रोजगारवाढीसह तरुणांचे स्थलांतर रोखण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मच्छीमार सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची गरज

जिल्ह्यातील अनेक मच्छीमार सहकारी संस्थांचे काम सध्या सभासदांना विविध योजनांसाठी दाखले देण्यापुरते मर्यादित राहिले आहे. काही संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व मच्छीमार संस्थांना एकत्र आणून मत्स्यशेतीच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाला सर्वंकष नियोजनाचे स्पष्ट निर्देश देण्याची मागणी मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

बहुजातीय मत्स्यबीज प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी स्थानिक मच्छीमारांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, आवश्यक प्रशिक्षण, बँकांचे अर्थसाहाय्य आणि उद्योजकांशी समन्वय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. योग्य अंमलबजावणी झाल्यास हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आर्थिक परिवर्तन घडविणारा मैलाचा दगड ठरेल, असे सांगत विष्णू मोंडकर यांनी गाबीत समाज व मच्छीमार बांधवांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

rapan bottom