Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी

मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी



श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण देवतांचा ग्राम प्रदक्षिणा सोहळा

भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे : देवस्थान ट्रस्टचे आवाहन


मालवण | प्रतिनिधी :
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्या निमित्त १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. भाविकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे,असे आवाहन श्री देव रामेश्वर, देव नारायण, देवी सातेरी, देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देव नारायण व सर्व देवतांना श्रीफळ ठेवून सांगणे करून निघणार आहे. आडवणमार्गे तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर येथे थांबून समुद्रमार्गे देव मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर देव दांडेश्वर मंदिर येथून श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबून जोशी मांड येथे येईल व त्यानंतर नगर वाचनालयाकडून सोमवार पेठेतील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबून बाजारपेठ भरडमार्गे देऊळवाडा येथे मंदिरात येईल.

पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदेवत रामेश्वर व नारायणाची पालखी प्रदक्षिणा तसेच रामेश्वर नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतो. ग्रामदेवतांची पालखी सजविण्यात येते. भूतनाथ येथे पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे - गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात येते. दुपारी एक वाजता रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटुंबीय आणि गावकर मानकरी रामेश्वरा समोर श्रीफळ ठेवून गाहाणे घालतात. ढोल-ताशांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडते.

मालवण समुद्र किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा,श्री देव दांडेश्वर, बंदर जेटीपर्यंत भाविकांची एकच गर्दी असते. समुद्र किनाऱ्यावर बांबू ची मंदिरे, देखावे साकारण्यात येतात. मच्छीमारांकडून श्री देव रामेश्वराचे उत्साहात स्वागत करण्यात येते. मोरयाचा धोंडा ते बाजारपेठ दरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. समुद्र किनार पट्टी ठिकठिकाणी पताका लावून सजविण्यात येते.

यावर्षी पालखी सोहळ्याला मालवणात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. बाजारपेठांमध्ये उत्साह असल्याने पालखी सोहळा न भुतो न भविष्यती असाच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळा उत्साहात होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. तर भाविक, ग्रामस्थ, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी संघ आणि समस्त मालवणकर हा सोहळा मोठ्या उत्साहात होण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

rapan bottom