Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड!

गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड!

जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वप्नपूर्ती

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मंगेश नलावडे | मालवण | प्रतिनिधी :
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी प्रामाणिक मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांमुळे यशाचे शिखर गाठता येते, हे मालवणच्या गीतांजली चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. वडिलांच्या अकाली निधनाचे दुःख मनात साठवून, खचून न जाता अथक परिश्रम आणि कठोर मेहनतीच्या जोरावर एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या माजी सिनिअर अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाण यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) निवड होण्याचा मान मिळवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाने सिंधुदुर्ग कॉलेजसह मालवणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गीतांजली चव्हाण या मालवण येथील एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या माजी सिनिअर अंडर ऑफिसर असून, त्यांनी ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीअंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच एनसीसीच्या माध्यमातून त्यांनी शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि देशसेवेची भावना आत्मसात केली. नियमित सराव, कठोर शारीरिक मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांमुळे त्यांनी स्वतःला स्पर्धात्मक भरती प्रक्रियेसाठी सक्षम बनवले. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फलित म्हणून महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड होण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.

जिद्दीने गाठले यश!

गीतांजली यांच्या यशामागे संघर्षाची आणि भावनिक वेदनांची कहाणी दडलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच अपघातात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगात मानसिकदृष्ट्या खचून जाणे स्वाभाविक असतानाही गीतांजली यांनी स्वतःला सावरले. वडिलांच्या आठवणींना प्रेरणास्थान मानत त्यांनी आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. दुःखावर मात करत मेहनतीत खंड पडू दिला नाही. शारीरिक सराव, अभ्यास आणि स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास कायम ठेवत त्यांनी यशाच्या दिशेने वाटचाल सुरूच ठेवली.

आज त्यांच्या या मेहनतीला यशाची झळाळी लाभली आहे. मुलीने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवलेले यश पाहण्यासाठी वडील प्रत्यक्षात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि संस्कार गीतांजली यांच्या पुढील वाटचालीत प्रेरणादायी ठरणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्दीचे, कष्टाचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक ठरले आहे. त्यांच्या निवडीमुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

एनसीसीच्या शिस्तीने घडवले यशस्वी व्यक्तिमत्त्व
गीतांजली यांच्या यशस्वी वाटचालीत सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. एनसीसी प्रशिक्षणातून मिळालेली शिस्त, नेतृत्वक्षमता, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते आणि लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गीतांजली यांच्या यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, संचालक ॲड. समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झांटये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कार्यालयीन कर्मचारी, एनसीसी विभागातील कॅडेट्स, मालवणचे पोलीस अधिकारी, तहसीलदार गणेश लव्हे तसेच मालवण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांनीही त्यांच्या यशाचे कौतुक केले.

५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेखर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर तसेच बटालियनमधील इतर संबंधित अधिकाऱ्यांनीही गीतांजली यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एनसीसीमधून करिअरच्या विविध संधी : डॉ. एम. आर. खोत

गीतांजली चव्हाण यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी केले आहे. एनसीसी हे केवळ शारीरिक प्रशिक्षणाचे माध्यम नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशभक्ती, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ आहे. एनसीसीच्या प्रशिक्षणामुळे पोलीस भरती, सैन्यदल, नौदल आणि विविध सुरक्षा सेवांमधील करिअरसाठी उपयुक्त तयारी करता येते. तसेच पात्रतेनुसार शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रांमध्येही एनसीसी प्रशिक्षणाचा अनुभव फायदेशीर ठरू शकतो, असे डॉ. खोत यांनी सांगितले.
महाविद्यालयीन स्तरावर बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमांसोबत विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सहभागी होता येते. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध जागा आणि पात्रतेनुसार एनसीसी प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, स्पर्धात्मक भरती प्रक्रियांसाठी सज्ज व्हावे आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

संघर्षातून यशाकडे; तरुणाईसमोर प्रेरणादायी आदर्श

गीतांजली चव्हाण यांचे यश हे केवळ एका विद्यार्थिनीचे वैयक्तिक यश नसून संकटांवर मात करून स्वप्नपूर्ती करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातही ध्येयापासून विचलित न होता त्यांनी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा नावलौकिक वाढला असून, मालवणच्या या जिद्दी कन्येची यशोगाथा स्पर्धा परीक्षांची आणि विविध भरती प्रक्रियांची तयारी करणाऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom