मालवण | प्रतिनिधी:- मालवण कातवड कुदळभाम येथील सौ. लक्ष्मी विष्णू कदम वय ७२ यांचे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) पहाटे राहत्या घरी निधन झाले. कातवड गावातील एक कष्टाळू आणि हसतमुख असे व्यक्तिमत्त्व होत्या. मनमिळावू स्वभाव व दातृत्ववान होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सून, दोन नातू, नाती, असा मोठा परिवार आहे. कातवड येथील एलआयसी एजंट श्यामसुंदर कदम यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या आकस्मित निधनाने कातवड गावात शोककळा पसरली आहे.

सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन
