Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे बंद असलेली सोनोग्राफी सेवा आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू

जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे बंद असलेली सोनोग्राफी सेवा आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू

जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथील रुग्ण कल्याण समिती आमदार नियुक्त प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांची माहिती

शानू वालावलकर | कुडाळ प्रतिनिधी :
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही मागील काही काळापासून आवश्यक मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद होती. त्यामुळे महिला रुग्ण, गर्भवती महिला तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेरील ठिकाणी जावे लागत होते.

ही बाब लक्षात घेऊन रुग्ण कल्याण समितीवरील आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून सोनोग्राफी सेवेसाठी डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे दर बुधवार व शनिवार दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे परिसरातील महिला व इतर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासोबतच रुग्णालयामध्ये महिला रुग्णांसाठी स्त्रीरोग तपासणी व उपचार, प्रसूती, सिझेरियन, विविध आजारांची तपासणी व उपचार तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांसारख्या आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.

“रुग्णालयात मशीन उपलब्ध असताना केवळ सेवा बंद राहणे ही रुग्णांच्या दृष्टीने गंभीर बाब होती. ही समस्या दूर करून सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार मा. श्री. निलेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला. आता डॉ. राजेश उबाळे यांच्या नियुक्तीमुळे ही सेवा पुन्हा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाली आहे,” असे रुग्ण कल्याण समिती आमदार नियुक्त प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी सांगितले.

कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार मा. श्री. निलेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. असे
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथील रुग्ण कल्याण समिती आमदार नियुक्त प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी सांगितले.

ruchira top