मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
१७ जानेवारी पर्यत पोलीस बंदोबस्तात होणार जत्रोत्सव
मालवण | प्रतिनिधी : वडाचापाट शांतादुर्गा देवस्थानच्या वार्षिक धार्मिक कार्यक्रम जत्रोत्सवाला कार्यकारी दंडाधिकारी मालवण यांच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. गावातील दोन गटातील वादामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र यां मनाई आदेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयाय दाद मागण्यात आली. त्यानुसार वडाचापाट श्री देवी शांतादुर्गा व रवळनाथ मंदिर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सवास साजरा करणे बाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे.
त्यानुसार कार्यकारी दंडाधिकारी मालवण यांनी आदेश काढला आहे. यातम्हटले आहे, श्री देवी शांतादुर्गा व रवळनाथ मंदिर मौजे वडाचापाट येथील वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील संदर्भिय आदेश प्राप्त झाला आहे. सदर आदेशास अधिन राहून श्री देवी शांतादुर्गा व रवळनाथ मंदिर येथील दिनांक 14 ते 17 जानेवारी 2025 या कालावधीत नियोजित केलेला वार्षिक जत्रोत्सव साजरा होईल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवावा. असे आदेशपत्र मालवण पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

