राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत व पदाधिकारी यांनी खासदार निलेश लंके यांचे केले स्वागत
मालवण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनीही खासदार निलेश लंके यांची भेट घेत केले स्वागत

मालवण : खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत 'आपला मावळा' संघटना यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे 1 मार्च रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 'आपला मावळा' संघटना यांच्या वतीने बॅंचेस, कचरा कुंडी, सूचना फलकही यावेळी देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने खासदार निलेश लंके यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवीकिरण गवस, मालवण तालुकाध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक अध्यक्ष नयन गावडे, सहकार जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नजीर शेख, अगस्तीन डिसोजा, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, महिला प्रदेश सरचिटणीस नम्रता ताई कुबल, विभागीय अध्यक्ष रवींद्र गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनीही खासदार निलेश लंके यांचे स्वागत केले. यावेळी कमलाकर कोचरेकर उपस्थित होते.

