Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

अमूर ससाण्याला मालवण समुद्र किनारी जीवदान

अमूर ससाण्याला मालवण समुद्र किनारी जीवदान

युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने केले रेस्क्यू

राहुल जाधव | स्काय न्युज टुडे मालवण : मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना 'अमूर ससाणा' एका ठिकाणी बसलाय आणि कावळे त्याला बोचता आहेत असे चित्र दिसले. प्रमोद खवणेकर व जगदीश तोडणकर यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधला. लगेच भार्गव खराडे आणि अक्षय रेवंडकर हे दोघेही मत्स्य लिलावाच्या ठिकाणी पोहोचले. अमुर ससाण्याला उमेश खांबोळकर यांनी कावळ्या पासून सोडवत पकडले. तो थोडा घाबरलेला दिसत होता.
अक्षय ने बघताक्षणी पक्षाला ओळखले. हा अतिशय दुर्मिळ पक्षी आहे. कबुतरा पेक्षा थोडा लहान असलेला असा हा पक्षी. त्याची चोच डोळ्या सभोवतालचा भाग, पाय, पिवळसर नारंगी रंगाचे होते. छाती कडचा भाग करडा आणि त्यावर काळ्या आडव्या पट्ट्या होत्या. शेपटी कडचा भाग थोडासा पट्ट्याचा आणि काळ्या रंगाचे पीस दिसत होते.
अक्षयने फोन करून दर्शन वेंगुर्लेकर, मेगल डिसोजा, साहिल कुबल, स्वाती पारकर यांना बोलावले. तसेच पक्षी तज्ञांनाही फोन केला. आणि वन खात्याला कळवले.
गुगल वर माहिती शोधताना 'अमूर ससाणा' हा सायबेरिया आणि उत्तर चीनमध्ये प्रजनन करतो. हिवाळ्याच्या दरम्याने भारतात येतो. सलग पाच हजार किलोमीटर अंतर न थांबता अरबी समुद्र पार करण्याची क्षमता या छोट्या पक्षात आहे. अशी माहिती मिळत होती. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडायला हवे यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्या ठिकाणी कावळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे थोड्या वेगळ्या भागात त्याला सोडावे असे सर्वानुमते ठरले.
त्याप्रमाणे युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेची टीम अक्षय, स्वाती, दर्शन, साहिल,भार्गव सगळे मिळून पक्षाला घेऊन कांदळवन असलेल्या भागात गेले. दर्शन ने हलकेच पक्षाला सोडले. तो उडाला कांदळवनात एका फांदीवर जाऊन बसला. तो त्याच्या दिशेने निघून गेला. त्याला टाटा बाय-बाय करत युथ बीटस फाॅर क्लायमेट ची टिम घरी परतली.

ruchira top