चौके :- मालवण तालुक्यातील आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण नवमी गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे..
या निमित्ताने चौके गावची ग्रामदेवता श्री भराडी देवी आपला भाऊ श्री जैन सकलेश्वर देवाच्या भेटीसाठी चौके गावातून सकाळी वाजत गाजत रयतेसह जंगलमय भागातून चालत संपूर्ण आंबेरी गावातील देवतांची भेट घेत रात्री आपला भाऊ सकलेश्वर मंदिरात विसावते. रात्री देवी भराडी मातेची मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर उशिरा चेंदवनकर दशावतांना नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर केला जातो सकाळी दशमीचे घाडगे फोडून देवी भराडी श्री जैन संकलेश्वर देवाचा जत्रोत्सव संपन्न होतो.यावेळी चौके आंबेरी गावातील ग्रामस्थ माहेरवाशीनी, चाकरमानी यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर भक्त भावीक उपस्थित असतात.

