उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली श्री.घनश्याम आढाव गोळवण येथे पोलिसांच्या ग्रामसंवाद उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद…
संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण डिकवल कुमामे ग्रामपंचायत येथे येणार्या अनोळखी लिंक्स किंवा फेक संदेश यांना प्रतिसाद देणे टाळल्यास आपली कोणतीही फसवूणक होणार नाही. त्यासाठी ग्राहकांनी जागरुक आणि सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.घनश्याम आढाव यांनी केले.

पोलिस प्रशासनाच्यावतीने गोळवण येथे ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं.१ च्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे व महिला सुरक्षा या विषयावर पठनाट्य सादरीकरण केले.
त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न विचारना केली.तेव्हा श्री.आढाव पुढे म्हणाले, गावातील मंदिरे घडताना गावातील शालेय गरजा यामध्ये विविध सुविधा निर्माण होण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना निर्माण करून ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे सुद्धा गरजेचे आहे. समाजात आज खोटी आश्वासने, अनेक प्रलोभने दाखवून ग्रामस्थांना फसविण्याचे प्रकार सुरू आहेत परंतु अशा सर्व प्रकारातून प्रत्येकाने सावध होऊन अशा कोणत्याही आमिषाला भुलू नका असे ही ते म्हणाले. त्यावेळी मालवण पोलीस निरीक्षक श्री.प्रविण कोल्हे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी गोळवण ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर,सदस्या सौ.प्राजक्ता चिरमुले, गोळवण पोलीस पाटील.अमित आंगचेकर,डिकवल. अद्विका डिकवलकर,कुमामे पोलीस पाटील. राजेंद्र चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष. संजय पाताडे,माजी सैनिक.सत्यविजय पालव, ग्रामस्थ जनार्दन गावडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष.वासुदेव पावसकर, विठ्ठल तळवडेकर, नामदेव चव्हाण, एकनाथ चव्हाण, महादेव तेजम, गंगाराम गावडे, संतोष गावडे, संतोष चव्हाण, महादेव पवार, सत्यवान चव्हाण,वासूदेव आंगचेकर, गणेश तावडे,ब्रिजमोहन अग्रवाल, उत्तम पाताडे,मेघा घाडी,दिपश्री आंगचेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे,संजय जाधव, अंगणवाडी सेविका. समिधा नाडकर्णी, विना जाधव,मिनल नाईक, रजनी पाडावे, आरोग्य सेवक. वासुदेव वाडकर, सौ.पेडणेकर.आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सुभाष लाड यांनी केले.तर आभार ग्रामसेविका. सेलटकर यांनी केले.

