Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करू- संदेश पारकर

पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करू- संदेश पारकर

सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम करू - परशुराम उपरकर

भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल - वैभव नाईक

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा - सतीश सावंत

शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली : निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्वांनी काम करूया. एकसंघ आणि एकजुटीने कार्यरत राहून शिवसेनेला बळकटी देऊया, एकदिवस आपल्या लढ्याला नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी मातोश्री हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे.मात्र जनतेने दिलेला कौल मान्य करून येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम आपण करू असे सांगितले.

माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आपल्याला लढावेच लागेल. प्रत्येकाला संधी मिळत असते भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल त्यासाठी आपण काम करीत राहिले पाहिजे

कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत म्हणाले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम यापुढेही आपण सुरु ठेवले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडले पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम पालव,उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,उपतालुका प्रमुख बाबू पेडणेकर,आबू पटेल, जयसिंग नाईक,महिला तालुका संघटक वैदेही गाडेकर,उपतालुका संघटक संजना कोलते,युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग,तात्या निकम,धनश्री मेस्त्री,राजू राठोड, सचिन सावंत,तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, राजू रावराणे,विलास गुडेकर, धीरज मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom