Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पिंगुळीच्या राऊळ महाराज मठात धाडसी चोरी

पिंगुळीच्या राऊळ महाराज मठात धाडसी चोरी

१३ किलो चांदीसह ५.३८ लाखाच्या ऐवजावर डल्ला

चार चोरटे सीसीटीव्हीत कैद

निलेश जोशी | कुडाळ : पिंगुळीतल्या परमपूज्य संत राऊळ महाराज मठात धाडसी चोरी झालीय. राऊळ महाराजांच्या समाधी मंदिरात आणि अण्णा महाराज मंदिरत ही चोरी झाली. यामध्ये चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. राऊळ महाराज समाधी मंदिरातून बाबांची चांदीची मूर्ती, पादुका, दत्त मूर्ती आणि चांदीचे ताट अशा एकूण १३ किलोच्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. तसंच दोन्ही मंदिरातल्या २० हजार रुपये किमतीच्या फंड पेट्या सुद्धा चोरीला गेल्या आहेत.एकूण ५ लाख ३८ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. पिंगुळीच्या संत राऊळ महाराज मठातल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चार चोरटे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, तोंडाला रुमाल बांधलेला आणि हातात ग्लोव्हज आहेत.पायात शूज आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या महितीनुसार आणि सद्गुरू राऊळ महाराज संस्थानचे उप कार्याध्यक्ष दशरथ राऊळ यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार. उत्तररात्री २.४९ ते ३ या दरम्यान हि चोरी झाली.

मंदिराच्या मागे टाकलेली फंडपेटी

संत राऊळ महाराज समाधी मंदिराचा औदुंबराकडचा दरवाजा नादुरुस्त असल्याने तो चोरटयांनी जोर लावून ढकलल्यावर लगेच उघडला. त्यांनतर चोरटे समाधी जवळ गेले समाधी वरची २ फूट उंचीची ६ किलो ९०० ग्रम वजनाची एक लाख रुपये किंमत असलेली मूर्ती, इथेच असलेली स्टीलची दहा हजार रुपये किमतीची फंडपेटी, जवळच असलेले ५ किमतीचे चांदीचे ताट चोरले. त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा अण्णा महाराज मंदिराकडे वळविला. त्या मंदिराच कुलूप तोडून आत प्रवेश केला त्या मंदिरातून ३ लाख ९८ हजार रुपये किमतीच्या ४ किलो ९९० ग्राम वजनाच्या चांदीच्या पादुका, १० हजार रुपये किमतीची लाकडी फंड पेटी आणि दत्त महाराजांची अर्था किलो वजनाची सुमरे ५ हजार रुपये किमतीची मूर्ती चोरली. या दोन्ही फंडपेट्या मात्र अण्णा महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यातले पैसे काढून घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. त्या दरम्यान काही पैसे देखील तिथे खाली पडलेले सापडले. दरम्यान हे चोरटे अण्णा महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागून गडग्यावरून उडी मारून आले असावेत . तिथला एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी हलवला. त्यानंतर ते चोरी करून त्याच मार्गाने पसार झाले असावेत असासंशय व्यक्त केला जातोय. आज श्वान पथक सुद्धा घटना स्थळी आल होत. श्वानाला फंड पेटीचा वास दिला असता श्वान मागे असलेल्या रेल्वे ट्रॅक पर्यंत जाऊन घुटमळला त्यावरून चोरट्यांनी ट्रॅक पलीकडच्या रस्त्यावर एखाद वाहन उभ करून ठेवल असाव आणि त्यातून नंतर ते फरार झाले असावेत असा संशय आहे. दरम्यान ठसे तज्ञांनी सुद्धा फंड पेटी वरचे वगैरे ठसे घेतले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा मूर्ती उचलताना

चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संत राऊळ महाराज मंदिरात चोरी झाली तेव्हा मंदिराचे पुजारी दिनेश ठाकूर हे त्याच मंदिरात झोपले होते. पण त्यांना याची जराही चाहूल लागू न देता चोरटयांनी शिताफीने चोरी केली. सकाळी दिनेश ठाकूर जेव्हा पूजा करण्यासाठी उठले आणि जेव्हा बाबांची मूर्ती दिसली नाही तेव्हा त्यांनी दशरथ राऊळ याना याची कल्पना दिली. एकंदरीतच एका प्रसिद्ध ठिकाणी सीसीटीव्ही सुरु असताना अवघ्या काही मिनिटात हि चोरी केल्यानं यापूर्वी चोरटयांनी रेकी केली असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. चोरी करण्याच्या पद्धतीवरून चोरटे सराईत असून लवकरच सापडतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

rapan bottom