Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवणची सुकन्या सानिका कांचन सुदेश आचरेकर यांचा अमेरिकेत डंका

मालवणची सुकन्या सानिका कांचन सुदेश आचरेकर यांचा अमेरिकेत डंका

टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात करणार करीयर

मालवण | प्रतिनिधी : मालवणची सुकन्या सानिका कांचन सुदेश आचरेकर यांनी अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. सानिका यां कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत असून डेटा सायन्स, एआय मध्ये स्वारस्य असून त्या क्षेत्रात करियर करणार असल्याचे सानिका यांनी सांगितले आहे.

एआय हा जागतिक बदल आहे. एआय अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणाली माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते. याच तंत्रज्ञानाद्वारे अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहज करते. यां क्षेत्रात सानिका यां आपले भविष्य पाहत असून त्या निश्चितच यशस्वी होतील अश्या शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेविका कांचन (स्नेहा) आचरेकर यांची सुकन्या. सानिका यांचे शालेय शिक्षण मालवण रोझरी इंग्लिश स्कूल येथे झाले. तर 11, 12 वी डीजी रुपारेल कॉलेज ऑफ सायन्स व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले.

डेटा सायन्स, एआय मधेच स्वारस्य आहे. म्हणून माहिती प्रणाली डेटा, एआय, व्यवस्थापनासाठी डेटा, एआय मॅनेजमेंटसाठी डेटा निवडतात. त्यानुसार लक्ष केंद्रित करून सानिका यांनी इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली.

एआय बऱ्याच मॅन्युअल गोष्टी घेत आहे, प्रत्येक गोष्ट डेटा आहे, आपण जे काही बोलता ते आपल्या फोनद्वारे संग्रहित केले जाते. त्याला डेटा म्हणतात. या डेटाला साफसफाईची आणि व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. वाचण्यास सोपे तसेच वापरकर्ता साठी अनुकूल असे अहवाल प्रदान करणे हे माझे काम आहे. हे क्षेत्र भविष्य आहे जग जसजसे वाढत जाईल तसतसे तंत्रज्ञान अधिक वेगाने वाढेल. असे सानिका यांनी यां निमित्ताने सांगितले.

पप्पा हे माझे ढाल आहेत, त्यांनी प्रत्येक पावलावर नेहमीच खंबीरता आणि साथ दिली. सोबतच हा प्रवास आई शिवाय शक्यच नसता. कारण आईंची दृष्टी असणे अत्यावश्यक आहे. माझ्या आईंची दूरदृष्टी, त्याग, समर्पण आणि अखंड मार्गदर्शन यामुळे मला या प्रवासात मदत झाली. भाऊ ओमने मला संयम आणि प्रत्येक परिस्थितीत शांत कसे राहायचे हे शिकवले. शाळेने मला खूप काही शिकवले आहे आणि मला एक चांगली व्यक्ती बनवले. माझे सर्व शिक्षक यांचे मिळालेले मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वाचे ठरले आहे. हे केवळ माझेच यश नाही तर प्रत्येक मालवणकराचे यश आहे. “कष्ट करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका” असेही सानिका यांनी यां निमित्ताने सांगितले.

rapan bottom