Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

रजत तोरसकरची खेलो इंडिया व राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

रजत तोरसकरची खेलो इंडिया व राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

टेबल टेनिसच्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभाग स्पर्धेमध्ये रौप्य पदक

मालवण : टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच सटणा, मध्यप्रदेश येथे पार पडल्या. सदरच्या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ,मध्य प्रदेश,राजस्थान या राज्यातील विद्यापीठांचा समावेश होता. सदरच्या स्पर्धामध्ये पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांनी भाग घेतला होता. रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले. अंतिम आठ संघामध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरीमध्ये चुरशीची झुंज देऊन संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघाने रौप्य पदक मिळवले. यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी रजतला मिळणार आहे.

रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमीचे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक श्री.विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ.राहुल पंतवालावलकर , सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री.हेमंत वालकर आणि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. रजत तोरसकरच्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडू याना प्रोत्साहन मिळणार आहे आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

rapan bottom