Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण !

मालवण नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण !

गौरेश कांबळी प्रथम, समीर वायंगणकर द्वितीय, भूषण मेतर तृतीय

राहुल जाधव | मालवण :
मालवण नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत आयोजित पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी नगरपरिषदेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर,

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, उद्योजक तथा शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेवक मंदार केणी, स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, स्पर्धक आणि पत्रकार उपस्थित होते.


गणेशोत्सवासारख्या लोकप्रिय सणाच्या माध्यमातून पर्यावरणरक्षणाची जाणीव निर्माण करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणपूरक सजावटीचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेश सजावट करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

स्पर्धेत श्री. गौरेश शरद कांबळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्री. समीर सुभाष वायंगणकर यांनी द्वितीय, तर श्री. भूषण राजन मेतर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. श्री. यश श्रीकृष्ण तारी आणि श्री. पार्थ प्रसाद वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि कापडी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या मूल्यमापन प्रक्रियेत योगदान दिल्याबद्दल परीक्षक सौ. स्वाती भालचंद्र पारकर आणि श्री. पार्थ साईनाथ मेस्त्री यांचाही गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, झाडाचे रोप, आणि कापडी पिशवी देऊन सन्मान करण्यात आला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीकृष्ण धाकू खोत, प्रफुल्ल वसंत देसाई, विजय चंद्रकांत अटक, अनिता अनिल केळुसकर, मधुकर दिगंबर चव्हाण आणि श्रीप्रसाद दयानंद सकपाळ यांना प्रमाणपत्र व कापडी पिशवी देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

स्वच्छ, सुंदर आणि हरित मालवणचा संकल्प

पर्यावरणसंवर्धनासाठी केवळ सणापुरते प्रयत्न न करता दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. कापडी पिशव्यांचा वापर वाढविणे, प्लास्टिक टाळणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे या बाबींवर या उपक्रमातून भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा शपथ’ घेऊन पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता आणि हरित पर्यावरण जपण्याचा संकल्प केला. नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.


‘माझी वसुंधरा – माझी जबाबदारी, स्वच्छ मालवण – आपली सर्वांची तयारी!’ हा संदेश देत मालवण शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top