Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आचरा कॉलेजची पहिल्याच प्रयत्नात विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी!

आचरा कॉलेजची पहिल्याच प्रयत्नात विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी!

सलग दोन दणदणीत विजयांसह अव्वल स्थान; गार्गी जुवेकर आणि अपर्णा सिंह यांची अर्धशतके

मालवण, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या महिला विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आचरा येथील आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ACMS) महाविद्यालयाच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्याच प्रयत्नात विजेतेपदाला गवसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केली. मालवण येथील बोर्डिंग मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत आचरा कॉलेजने साखळी फेरीतील दोन्ही सामने दणदणीत फरकाने जिंकत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले. कर्णधार गार्गी जुवेकर आणि अपर्णा सिंह यांच्या आक्रमक अर्धशतकांसह गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे आचरा कॉलेजने प्रतिस्पर्धी संघांवर निर्विवाद वर्चस्व गाजविले.


स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आचरा कॉलेजचा सामना देवगड येथील एस. एच. केळकर महाविद्यालयाशी झाला. आचरा कॉलेजची कर्णधार गार्गी जुवेकर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आचरा कॉलेजने १० षटकांत १ बाद १०८ धावांची भक्कम मजल मारली. गार्गी जुवेकरने नाबाद ३०, तर करिश्मा निंबारेने नाबाद २४ धावांचे योगदान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना एस. एच. केळकर महाविद्यालयाचा संघ १० षटकांत ९ बाद अवघ्या ३४ धावांवर गारद झाला. आचरा कॉलेजकडून शारदा सुर्वे आणि कर्णधार गार्गी जुवेकर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भक्ती कविंदे आणि तन्वी पवार यांनीही गोलंदाजीत योगदान दिले. या शानदार कामगिरीच्या जोरावर आचरा कॉलेजने पहिला सामना तब्बल ७४ धावांनी जिंकला.

दुसऱ्या सामन्यात आचरा कॉलेजसमोर मालवण येथील एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे आव्हान होते. या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आचरा कॉलेजने १० षटकांत २ बाद १५० धावांचा तडाखेबंद डाव उभारला. अपर्णा सिंहने नऊ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली, तर कर्णधार गार्गी जुवेकरने सात चौकारांसह ५० धावा फटकावत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. दोघींच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले.

प्रत्युत्तरात एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा संघ १० षटकांत ६ बाद ४३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. गार्गी जुवेकरने एक षटक निर्धाव टाकत दोन बळी मिळविले. शारदा सुर्वेनेही दोन, तर तन्वी पवारने एक बळी घेतला. परिणामी, आचरा कॉलेजने हा सामना तब्बल १०७ धावांनी जिंकत स्पर्धेतील आपले वर्चस्व अधोरेखित केले.

या उल्लेखनीय यशामागे विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर, सुशील शेडगे आणि ज्ञानेश केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या यशाबद्दल आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप मिराशी, आचरा कॉलेजचे अध्यक्ष संजय मिराशी, खजिनदार विद्यानंद परब, सचिव समीर बावकर आणि प्राचार्य नितेश सारंग यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

दरम्यान, येत्या २ नोव्हेंबरपासून माटुंगा जिमखाना येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी कोकण झोन संघात आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या तब्बल सात खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे आचरा कॉलेजच्या महिला क्रिकेट संघाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पहिल्याच प्रयत्नात विभागीय विजेतेपद, दोन्ही सामन्यांत दणदणीत विजय आणि आंतरविभागीय स्पर्धेसाठी सात खेळाडूंची निवड, अशा दमदार कामगिरीमुळे आचरा कॉलेजच्या महिला क्रिकेट संघाचे सर्वत्र कौतुक होत असून क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top