Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

टेबल टेनिस प्रशिक्षक परीक्षेत सिंधुदुर्गचे घवघवीत यश; महेश तळवडेकर यांचा राज्यात प्रथम क्रमांक!

टेबल टेनिस प्रशिक्षक परीक्षेत सिंधुदुर्गचे घवघवीत यश; महेश तळवडेकर यांचा राज्यात प्रथम क्रमांक!


लेव्हल १ परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत महेश तळवडेकर यांची ऐतिहासिक कामगिरी;

विष्णू कोरगांवकर यांच्यासह दोन्ही परीक्षांत 'अ' श्रेणीत यश

मालवण | प्रतिनिधी:  
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने व सूरज फाउंडेशन, सांगली यांच्या सहकार्याने आयोजित टेबल टेनिस प्रशिक्षकांच्या लेव्हल १ व लेव्हल २ प्रशिक्षण शिबिर व परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मालवणचे प्रशिक्षक महेश तळवडेकर यांनी लेव्हल १ परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. तर विष्णू कोरगांवकर आणि महेश तळवडेकर या दोन्ही प्रशिक्षकांनी लेव्हल १ व लेव्हल २ परीक्षा 'अ' श्रेणीत उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने १६ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवकृष्णा व्हॅली गुरुकुल, सांगली येथे तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर व परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील टेबल टेनिस प्रशिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षण शिबिरादरम्यान प्रशिक्षकांना टेबल टेनिस खेळातील तांत्रिक कौशल्ये, आधुनिक प्रशिक्षण पद्धती, खेळाडूंचा शारीरिक व मानसिक विकास, खेळाचे नियम, स्पर्धात्मक दृष्टिकोन तसेच प्रभावी प्रशिक्षण नियोजन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षकांच्या ज्ञानात भर घालणे, त्यांची व्यावसायिक गुणवत्ता उंचावणे आणि महाराष्ट्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षकांची सक्षम फळी निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
विष्णू कोरगांवकर आणि महेश तळवडेकर त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रशिक्षकांच्या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, शास्त्रशुद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या दृष्टीने हे यश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस यांच्या पुढाकारातून या प्रशिक्षण शिबिराचे व परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशिक्षकांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन सिंधुदुर्गचे सचिव हेमंत वालकर, असोसिएशनचे पदाधिकारी तसेच मालवणमधील टेबल टेनिस प्रेमींनी विष्णू कोरगांवकर आणि महेश तळवडेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ruchira top