Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

वीज वितरणच्या बेजबाबदार पणामुळे मळेवाड येथील पत्रकार मुरकर जखमी

सावंतवाडी : मळेवाड येथून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना घोडेमुख येथे पत्रकार मदन मुरकर यांच्या दुचाकीला गंजलेली तार अडकून अपघात झाला. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मूरकर यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. सुदैवाने मोठा अपघात टळला. परंतु धोका कायम असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
घोडेमुख - पेंडूर ग्रामपंचायत जवळील मुख्य रस्त्यावर विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देणारी वायर उघड्यावर काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान गुरांच्या ये जा करण्यामुळे ही वायर मुख्य रस्त्यावर आली असून चालकांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सविस्तर माहिती अशी की, मदन मुरकर हे सावंतवाडीच्या दिशेने जात असताना पेंडूर घोडेमुख ग्रामपंचायती जवळील मुख्य रस्त्यावर असलेली तार त्यांच्या दुचाकीच्या चाकाला गुंडाळली. सुमारे चार ते पाच मीटर दुचाकी गेल्यानंतर मदन मुरकर यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व दुचाकी घसरली व अपघात झाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मुरकर यांना बाजूला केले व दुचाकीला अडकलेली वायर काढली.
विद्युत वितरण कंपनीचे जीर्ण झालेले विद्युत खांब, टाकाऊ तारा व विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडे याकडे वीज वितरणचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अजून किती अपघात पाहणार असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरणला केला आहे.

rapan bottom