सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल नेटवर्क सुधारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा
आवश्यक उपाययोजना करून दर तीन महिन्यांनी अहवाल सादर होणार
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल नेटवर्क समस्यांसंदर्भात बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांच्यासमवेत पालकमंत्री नितेश राणे यांची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल नेटवर्क सुधारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्कचे टॉवर अनेक ठिकाणी आहेत पण त्या टॉवर वरून ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही. ग्रामीण भागात देखील नागरिकांना नेटवर्क समस्या उद्भवतात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे ह्या जिल्ह्यात जलद नेटवर्क असणे गरजेचे आहे. हि बाब यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत जिल्ह्यातील नेटवर्क सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

