Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

परप्रांतीय साखळी चोराला पणदूर ग्रामसंस्थांचा प्रसाद

परप्रांतीय साखळी चोराला पणदूर ग्रामसंस्थांचा प्रसाद

महिलेची सोनसाखळी हिसकावून पळताना सापडला

निलेश जोशी | कुडाळ : पणदूर - घोडगे रस्त्यानजिक डिगस - चोरगेवाडी फाटा ते सुर्वेवाडी दरम्यान एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय युवकाने केला. मात्र त्या महिलेने प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. त्यानंतर तेथून पलायन केलेल्या त्या युवकाला पणदूर येथे ग्रामस्थांनी पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना गुरूवारी सायं. 7.30 वा.च्या सुमारास घडली.
पणदूर हून डिगस सुर्वेवाडीच्या दिशेने सायंकाळी एक महिला रस्त्याने पायी चालत जात होती. चोरगेवाडी फाटा नजिक दरम्यानच्या वेळी मागावून आलेल्या एका वीस वर्षीय युवकाने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने प्रतिकार केल्याने सुदैवाने सोन्याची चैन चोरण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्या युवकाने तिच्या हातातील किरकोळ रोख रक्कम असलेली छोटी पर्स हिसकावली. यावेळी तिने आरडाओरडला केल्याने संशयित युवक तेथून पसार झाला. स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहीती मिळताच संशयिताचा पाठलाग करीत शोधाशोध केल्यावर तो पणदूर तेथे सापडला. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच कुडाळ पोलिसांना पाचारण करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पुढील कारवाई केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

rapan bottom