Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

विविध कार्यक्रमांचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : अमली पदार्थ विरोधी दिन* औचित्य साधून कुडाळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्याला सर्वस्तरातून फार चांगला प्रतिसाद मिळाला.


कुडाळ हायस्कूल कुडाळ व जुनिअर कॉलेज मार्फत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मार्गदर्शन व जीत्याची खोड हा लघुपट दाखवण्यात आला. संत राऊळ महाराज कॉलेज येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच लघुपट दाखवण्यात आला. पणदूर हायस्कूल पणदूर येथे विद्यार्थ्यांना जित्याची खोड हा लघुपट तसेच मार्गदर्शन करण्यात आले. वसोली हायस्कूल, तुळसुली हायस्कूल , साळगाव डीएड कॉलेज मधील विद्यार्थ्यांना लघुपट तसेच अमली पदार्थ बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ एसटी स्टँड, कुडाळ रेल्वे स्टेशन येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सह्यांची मोहीम राबविण्यात आली.


या दिनानिमित्त केमिस्ट व ड्रगिस्ट, औषध विक्रेते दुकानदार व पुरवठादार यांची पोलिस ठाणे येथे मीटिंग आयोजित करण्यात आली. कुडाळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये राबविण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये या दिवसाचे महत्त्व पटवून तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे भविष्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे सहकार्य प्राधान्याने राहील याबाबत आश्वस्त करण्यात आले.
सर्व कार्यक्रमांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे, तसेच कुडाळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, स पो निरीक्षक श्रीमती आडकुर, पोलीस उपनिरीक्षक श्री धडे, श्री. भांड, श्री. पाडावे तसेच कुडाळ पोलीस ठाणे कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला.

rapan bottom