माझ्या कार्यप्रवासातील आपल्या सर्वांची साथ अशीच सदैव राहो : मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्यक्ष भेटीद्वारे तसेच फोन आणि मेसेज द्वारे व्यक्त केलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे खूप खूप आभार ! शुभेच्छा रुपी मिळालेले आपले प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यातील खरी संपत्ती आहे. माझ्या कार्यप्रवासातील आपल्या सर्वांची साथ अशीच सदैव राहो हीच सदिच्छा. आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार!

