Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ येथील लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयितास जामीन

कुडाळ येथील लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयितास जामीन

ऍड. अमोल सामंत आणि ऍड. हितेश कुडाळकर यांनी केला युक्तिवाद

निलेश जोशी | कुडाळ : येथील एका मोठ्या आस्थापनेमध्ये काम करत असलेल्या फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारी वरून तिथेच काम करत असलेला संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या राहणार हिंदू कॉलनी, मूळ रा पोहरे मशीवीवाडी ता. देवगड) याने फिर्यादी युवतीवर तिच्या मनाविरुद्ध लैंगिंक अत्याचार केल्या प्रकरणी त्याची ओरोस येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांनी रु. ५० हजार च्या जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपी यांच्या वतीने ऍड. अमोल सुरेश सामंत आणि ऍड. हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पहिले.
या प्रकरणात फिर्यादी हिने संबंधित संशयित आरोपी याच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून कुडाळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 134/2025 नुसार भा.न्या.सं. कलम 63(अ), 63(ड), 64, 75(1)i, 75(1)ii ,78(1), 332(ब), 351(2) प्रमाणे दि. 02/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.18/04/2025 रोजीच्या रात्री कुडाळ येथील अपार्टमेट मध्ये फिर्यादी हीने दिलेल्या फिर्यादीवरुन फिर्यादी हिला संशयित आरोपी याने जॉब जाण्याची भीती घालून फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवून फिर्यादी हिला धमकी दिली. म्हणुन फिर्यादी हिने आरोपी याचेविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली होती. म्हणून फिर्यादी हीने दिलेल्या फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे.
कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजी. नं. 134/ 2025 च्या गुन्ह्या मधून आरोपी याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी म्हणून ओरोस येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात अर्ज केला होता आरोपी यांच्या वतीने ऍड.अमोल सुरेश सामंत आणि ऍड. हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पहिले. या कामी आरोपी याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेवून मे. कोर्टाने आज रोजी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर याची 50,000/- रुपयांच्या जामिनावर आणि अटी व शर्तीवर मुक्तता करण्यात आली आहे.

rapan bottom