▪️समाजकार्याचा अखंड वाहणारा झरा
▪️मालवण पंचायत समिती माजी सभापती कर्तृत्ववान नेतृत्व श्री. सुनील घाडीगांवकर हिरकमहोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा
काही माणसे जन्माला येतात ती समाजकार्यासाठीच. जनसेवा ही त्यांच्या नसानसात असते. सतत जनतेचा विचार आणि विकासाचा ध्यास घेऊन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या अश्या अनेक व्यक्तिमत्वानी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. कर्तृत्व… दातृत्वा… नेतृत्व… अंगी असलेले त्यापैकीच एक डॅशिंग नेतृत्व मालवण पंचायत समितीचे माजी सभापती सुनील घाडीगांवकर हे होय..!
आज सुनील घाडीगांवकर यांचा ६० वा अर्थात हिरक महोत्सवी वाढदिवस. जनसेवेसाठी वाहून घेतलेले हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. समाजकार्याचा अखंड वाहणारा झरा आहे. शाखाप्रमुख ते सभापती हा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने त्यांचे कर्तृत्व सिद्ध करणारा आहे. समाजसेवक, एक यशस्वी उद्योजक आणि जनतेच्या हृदयातील लोकप्रतिनिधी अश्या तीनही क्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावत यशाला गवसाणी घालणारे हे नेतृत्व सर्वसामान्य जनतेत राहून समाजसेवेसाठी कार्यरत आहे.
एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला समजता नये. मदत ही मोठेपणा मिळवण्यासाठी नाही तर आपण या समाजाचे काही देणे लागतो त्या अर्थाने ते आपले दाईत्व आहे. या भावानेतून काम करणारे सुनील घाडीगावकर प्रसिद्धी, फोटोसेशन यापासून नेहमीच दूर राहिले. मात्र त्यांच्या सेवाकार्याचा आलेख नेहमीच उंच राहिला. प्रसिद्धीच्या फोटो पेक्षा जनतेच्या हृदयात असलेले स्थान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. ही त्यांची भावना खऱ्या अर्थाने आदर्शवत म्हणावी लागेल.

निसर्ग संपन्न मालवण तालुक्यातील घनदाट डोंगरी भागातील शिरवंडे गावचे सुनील घाडीगावकर हे रत्न. राणे साहेबांच्या नेतृत्वात 1990 पासून सुरु झालेला सामाजिक व राजकीय प्रवास अखंडित सुरु आहे. आता तर विकासाला हायस्पीड दिशा मिळाली आहे, आमदार निलेशजी राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेला हा प्रवास जनतेसाठी अविरत सुरु राहील.
राणे साहेबांच्या आशीर्वादाने 1990 साली शिरवंडे शाखाप्रमुख म्हणून राजकारणाचा श्री गणेशा केल्या नंतर सुनील घाडीगावकर यांना खंबीर साथ दत्ता सामंत यांची मिळाली. त्यावेळी दत्ता सामंत हे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. राणे साहेबानी आमदार, विरोधीपक्षनेते, मंत्री, मुख्यमंत्री असा राजकारणातील बहुमान प्राप्त केला. त्याचवेळी त्यांनी कार्यकर्ते घडवले. सुनील घाडीगावकर यांच्याही कार्यकर्तृत्वाचा राणे साहेबांनी नेहमीच सन्मान केला. शिरवंडे गावचे सरपंच, तीन टर्म पंचायत समिती सदस्य, तालूका सभापती हा सन्मान निश्चितच सुनील घाडीगावकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा होता.
सुनील घाडीगावकर यांनी नेहमीच सभागृहात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला. मतदारसंघातील विकासासाठी जास्तीतजास्त विकासनिधी मिळाला पाहिजे यासाठी त्यांची भुमिका आग्रही राहिली. सोबतच पंचायत समिती सभागृहात सर्व सदस्यांना सोबत घेऊन पुढे जाणे. सहकारी सदस्यांच्या पाठीशी राहणे. सदस्यांचे प्रश्न सोडवून घेणे हे सुनील घाडीगावकर यांचे नेतृत्वगुण त्यांचे कर्तृत्व सिद्ध करणारे ठरले. पंचायत समितीच्या अनेक मिटिंग सुनील घाडीगावकर यांनी आपल्या आक्रमक भूमिकेतून गाजवल्या. सुनील घाडीगावकर मांडत असलेले प्रश्न जनतेच्या हिताचेच असायचे आणि ते सोडवले गेलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह नेहमीच राहिला. सर्व सदस्य त्यांचाही पाठिंबा नेहमीच त्यांना मिळाला. त्यांचा पंचायत समिती सदस्य ते सभापती कार्यकाळ यशस्वी राहिला.
सुनील घाडीगावकर यांना पत्नी सोनाली घाडीगावकर यांची साथ भक्कम लाभली. त्यांनीही पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले. पती सुनील घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीही जिल्हापरिषद सदस्या म्हणून यशस्वी कार्यकाळ पुर्ण केला.
वडिलांचे कार्यकर्तृत्व पाहत असलेला मुलगा सुशांत हाही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवेसाठी तत्पर असतो. एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून कार्यरत असताना जनतेशी असलेली नाळ सुशांत यानेही कायम जपली आहेत. शांत, संयम्मी आणि कर्तृत्ववान असे हे नेतृत्व जनतेलाही खऱ्या अर्थाने आपले वाटते.
राणे साहेबांचे आशीर्वाद आणि दत्ता सामंत यांची खंबीर साथ
सुनिल घाडीगांवकर सांगतात, खासदार राणेसाहेबांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच मिळाले. सोबतच दत्ता सामंत यांची खंबीर साथ लाभली. आता तर आमदार निलेश राणे यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व लाभले आहे. तर नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे जनतेची सेवा आणि विकास कार्याला अधिक बळ निश्चितच मिळत आहे. असे सुनील घाडीगावकर सांगतात.
एकूणच सुनील घाडीगांवकर व त्यांच्या कुटुंबियांच्या हातून जनसेवा व विकासकार्य घडत राहो. ६० अर्थात हिरकमहोत्सवी वाढदिवस साजरा करणारे सुनील घाडीगावकर अमृत महोत्सव आणि शतकमहोत्सव साजरा करोत. याचं असंख्य शुभेच्छा…!
शब्दांकन : अमित खोत, मालवण

