भव्य स्वरूपातील नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा २८ एप्रिल पासून
निलेश बागवे व बंड्या स्पोर्ट्स मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजन
जुबेर खान | मसुरे : मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथे निलेश बागवे व बंड्या स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित देऊळवाडा प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य नाइट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 28, 29, 30 एप्रिल रोजी या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 25,000 व चषक, द्वितीय पारितोषिक 15,000 व चषक, तृतीय पारितोषिक 4,000 व चषक, चतुर्थ पारितोषिक 4,000 व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण "स्काय न्युज टुडे" या यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. 10 संघ विकत घेण्यात येणार आहेत. 19 एप्रिल रोजी लिलाव होणार आहे. तरी स्पर्धकांनी 15 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी मिलिंद परब : ९४०४१६५१७०, अतुल परब :८२६१०४५३७८, बापूजी बागवे : ९४०४४४६३८२, वैभव राणे: ९४०४४४३४०३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

