मालवण: मालवण तालुक्यातील वायरी मोरेश्वर वाडी येथील मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
मराठी आरमारासाठी समुद्रात एखादे भक्कम आश्रयस्थळ असावे, या विचारातून पाहणी सुरू झाली, आणि मालवणजवळचे कुरटे बेट छत्रपती शिवाजी महाराजांना आवडले. ‘चौऱ्यांशी बंदरी ऐसी जागा नाही’, ‘अठरा टोपकरांच्या उरावर सिंधुदुर्ग अजिंक्य जागा निर्माण केला’ अशा शब्दांत पुढे सिंधुदुर्गाची ख्याती झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत ज्या ठिकाणी शिवलंका किल्ले सिंधुदुर्गाची पायाभरणी झाली, तो मोरयाचा धोंडा. म्हणूनच दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी स्थानिक मच्छिमार व रहिवाशी यांच्या वतीने पूजा केली जाते.या पूजेचा मान दाजी जोशी यांना लाभला.

यावेळी दाजी जोशी, सुधीर जोशी, मंथन जोशी, मुकेश जोशी, शेखर भगत, दीपक ढोके, मेस्त, नितीन साळगावकर व अन्य शिवप्रेमी उपस्थित होते



