Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

नेरुर, देऊळवाडा : भव्य स्वरूपात संविधान चित्ररथ रॅली

नेरुर, देऊळवाडा : भव्य स्वरूपात संविधान चित्ररथ रॅली

मिली मिश्रा | कुडाळ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा नेरुर, पंचशील नगर, पंचशील मंडळ नेरुर, समता नगर, आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपात संविधान चित्ररथ रॅली कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि ग्रामपंचायत नेरुर, देऊळवाडा यांच्या सहकार्याने निघाली. रॅली ग्रामपंचायत नेरुर, देऊळवाडा पासून सुरुवात होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुडाळ येथ पर्यंत होती.

या रॅलीमध्ये ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा, विद्यमान सरपंच , उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, संविधान सन्मान कार्यकर्ते, नियोजन समिती नेरुर , सर्व माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व माजी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, सर्व सीआरपी ताई , आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती समिती आशा स्वयंसेविका, प्रभाग संघ प्रमुख, सर्व महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. संविधानाचे महत्त्व सर्व स्तरापर्यंत पोहोचावे या साठी या रॅली चे आयोजन केले होते असे आयोजकांनी सांगितले. रॅली मध्ये ३ चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. पहिल्या चित्ररथामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे दृश्य , दुसऱ्या चित्र रथामध्ये डॉ. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये रुपयाचे महत्त्व पटवून देऊन खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरतेची सुरुवात केली हे सांगणारे दृष आणि संविधानाची प्रतिकृती आणि तिसऱ्या आणि शेवटच्या दृषामध्ये असे सर्व मिळून भारत देश तयार होतो हे सांगण्यासाठी भारत देशाची प्रतिकृती असे दृश्य तयार केले होते. रॅली चे उद्घाटन नेरूर येथे विद्यमान सरपंच मा. भक्ती घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. रॅली कुडाळ ला आल्यानंतर कुडाळ नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. प्राजक्ता शिरवलकर यांनीही उपस्थिती दर्शवून प्रजासत्ताक दिनाच्या व संविधान अमृत दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

rapan bottom