Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना व्हीप

कुडाळ नगराध्यक्ष निवडणूक

सचेतक मंदार शिरसाट यांनी बजावला व्हीप

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना महाविकास आघाडीचे मुख्य सचेतक तथा गटनेता मंदार श्रीकृष्ण शिरसाठ यांनी 24 जानेवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेदवार सौ सई देवानंद काळप यांना मतदान करावे यासाठी व्हीप बजावला आहे.श्री शिरसाट यांनी कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीचे नगरसेवक ज्योती जयेद्र जळवी, श्रुती राकेश वर्दम, श्रेया शेखर गवंडे, आफरीन अब्बास करोल, अक्षता अनंत खटावकर, सई देवानंद काळप, मंदार श्रीकृष्ण शिरसाठ, उदय रामचंद्र मांजरेकर व किरण चंद्रकांत शिंदे या नऊही सदस्यांना बजावला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या सर्व कुडाळ नगरपंचायतीतील सर्व सदस्यांना ही सूचना दिली जाते की 24/1/2025 रोजी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडी करता मतदान होणारे आहे. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना प्रस्तुत सचेतकीय परिपत्रकाने कळविण्यात येते की शुक्रवार दिनांक 24/1/2025 रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तर्फे सई देवानंद काळप या अधिकृत उमेदवार आहेत.

तरी महाविकास आघाडीच्या सर्व कुडाळ नगरपंचायतीच्या सदस्यांनी 24/1/25 रोजी दालनात उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिये दरम्यान सकाळी दहा पंचेचाळीस ते एक वाजेपर्यंत हजर राहावयाचे आहे व पक्षाच्या भूमिकेनुसार महा विकास आघाडीचे भूमिकेनुसार आपली मते हे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ. सई देवानंद काळप यांना निवडणूक प्रक्रियेप्रमाणे द्यावयाचे आहे. ही नोटीस 22 जानेवारी 2025 रोजी दिली असून मंदार शिरसाठ यांची यावर स्वाक्षरी आहे. उर्वरित नऊ सदस्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत आणि त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

rapan bottom