Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

४२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेरली गावात गावरहाटीची मोठ्या आनंदमय वातावरणात झाली सुरुवात

४२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेरली गावात गावरहाटीची मोठ्या आनंदमय वातावरणात झाली सुरुवात

भाऊ भोगले | बागायत : मालवण तालुक्यातील प्रसिद्ध वेरली गावची गावरहाटी गेली ४२ वर्षे काही कारणास्तव बंद होती. यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रथमच सोने लुटून गावरहाटीला शुभ मुहूर्त करण्यात आला. याचवेळी सर्व गावातील मान्यवर व्यक्ती तसेच भाविक भक्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तरंग नाचविण्यात आले. त्यानंतर पूर्वां पार चालत आलेल्या चाली रुढी प्रमाणे देवदिवाळीच्या दिवशी श्रीदेवी सातेरी आणि इतर देव पंचायतन तरंगांसह गावातील देवस्थानांच्या भेटीला निघाले होते. यावेळी सर्वप्रथम श्री देव गांगेश्वर मंदिर त्या ठिकाणी एक दिवस निवास, दुसऱ्या दिवशी सायंकाळी मार्गस्थ होऊन श्री देव रवळनाथ (चव्हाटा राई )येथे निवास, तिसऱ्या दिवशी सायंकाळी मार्गस्थ होऊन मुणगेकरवाडी येथील श्री देवी विठ्ठला देवी (चाळा) येथे निवास केला .चौथ्या दिवशी दुपारी महाप्रसाद घेऊन सायंकाळी गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक ,भक्तगणांनी तसेच माहेरवासीनी ,गावातील व गावाबाहेरी सुवासिनी यांनी ओट्या भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा सोहळा आताच्या पिढीला प्रथमच पाहायला मिळाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नवस करणे नवस फेडण्यात आले. मुणगेकरवाडीतील स्थानिक तसेच मुंबईकर उपस्थित राहून भाविक भक्तगणांची चोख व्यवस्था पार पाडली.


विठ्ठलादेवी येथून परतीच्या प्रवासाला निघताना गावातील मुंबईतील आजूबाजूच्या गावातील भाविक भक्त तसेच माहेरवासीनींची मोठी गर्दी पहावयास मिळाली संपूर्ण आसमंत "हर हर महादेव" आणि "विठ्ठलादेवी मातेचा विजय असो "अशा नामघोषाने दुमदुमून गेला.
गावातून जाताना ठिकठिकाणी स्थानिकांनी रस्त्यात सडा रांगोळी काढून त्यावर शालीच्या घड्या घालून देवांना आरती ओवाळून त्यांची मनोभावे पूजा करत नमस्कार करून पुढच्या प्रवासाला निघत होते.
मंदिराच्या वेशीपाशी संपूर्ण गावातील तरुण वर्ग जेष्ठ त्याचप्रमाणे महिलावर्ग एकत्र येवून मोठा जल्लोष केला.पारंपारिक वाद्यावर ठेका धरत नाचत नाचत देवांचे स्वागत करत "हर हर हर महादेव"जयघोषात तल्लीन होऊन फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व पंचायतन देवांना तरंगांसह मंदिरापर्यंत घेऊन आले .यावेळी सर्वांच्या डोळ्यात मोठा आनंद दिसत होता कारण हा संपूर्ण आनंद 42 वर्ष त्यांना घेता आला नव्हता. तर अनेकांना माहीतच नव्हता . रात्री देवगड येथील समई नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.


पाचव्या दिवशी धार्मिक विधि आटोपून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिनांक 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर या संपूर्ण कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधले ते विठ्ठलादेवीच्या तरंगाने संपूर्ण वेरली गावाच्या चहू बाजूंच्या वेशीला यातरंगाने धावत जाऊन भेटी दिल्या होत्या . यावेळी तरुणांनी त्या तरंगासोबत धावण्याचा आनंद लुटला.

rapan bottom