नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
तब्बल 61 लाख रु. किमतिचा मुद्देमाल जप्त
अदित्य बटावले | सावंतवाडी : नववर्षाच्या व ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली वाहनांची तपासणी केली त्यामध्ये ट्रक क्रमांक (DD 01 H 9941) याची तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली.
सापडलेल्या दारू मध्ये गोवा बनवण्याची रॉयल सिलेक्ट डीलक्स व्हिस्की, एव्हरग्रीश रिजर्व विस्की याचे एकुण 1 हजार 20 बॉक्स सापडले. यामध्ये ओमप्रकाश गुप्ता (रा.नवी मुंबई) शिवलखन केवट ( रा.मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये गोवा बनावटीची दारू तसेच ट्रक मिळून तब्बल 61 लाख 28 हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला

