मिली मिश्रा | कुडाळ : कुडाळ येथील व्हिक्टर डांटस चॅरिटेबल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचे व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज येथे आज,२८ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. अधिवक्ता परिषद सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती,कुडाळ आणि कुडाळ तालुका वकील संघटना, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळेस सर्व वरिष्ठ वकील मान्यवरांनी विद्यार्थ्याना संविधानाची निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संविधानिक मूल्ये ह्या बाबत माहिती देत मार्गदर्शन केले. गणेश वंदना व मान्यवरांचे स्वागत व त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्या नंतर व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा विद्यार्थी, यादनिक नाबर याच्या माध्यमातून संविधान व त्याच्या निर्मितीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती व इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा व भारतीय संविधानाविषयी केलेले कार्य आणि संविधानिक मूल्ये ह्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास मान्यवर म्हणून अधिवक्ता परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष व माजी सरकारी वकील ॲड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, वरिष्ठ वकील ॲड. उमेश सावंत, कुडाळ तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. शेखर वैद्य व व्हिक्टर डांटस चॅरिटेबल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष व्हिक्टर डांटस उपस्थित होते.

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा.
