संजय माने | पोईप : मालवण कुडाळ विधानसभा निवडणूकसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले, असून कुडाळ विधानसभा मतदारसंघातील पोईप येथे मतदान सुरू आहे. सकाळपासूनच दोन्ही ही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळत होती . पोईप येथे एकूण ११९८ मतदारांपैकी ८५४ मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला.
केंद्र निहाय आकडेवारी
सकाळी ७ ते ६ पर्यंत केंद्र क्रमांक ४० यामध्ये पुरुष ३१३ , महिला २८१ एकूण ५९४, केंद्र क्रमांक ४१ मध्ये पुरुष १४३, महिला ११७ एकूण २६०,पर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

