बुधवळे येथील उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश
मालवण : बुधवळे येथील उबाठा गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यात माजी ग्राप सदस्य कुणकेश येरम, महादेव घागरे, माजी शाखा प्रमुख समीर घागरे, आकाश परब, अशोक शिर्सेकर, साहिल शिर्सेकर, किरण जोईल, समीर मुणगेकर, रणजित घागरे, विघ्नेश येरम, अविनाश सरमळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना पदाधिकारी यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

