Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पुन्हा महायुतीचेच सरकार; १६० पेक्षा जास्त आमदार विजयी होणार !

पुन्हा महायुतीचेच सरकार; १६० पेक्षा जास्त आमदार विजयी होणार !

मालवण कुडाळ मधून निलेश राणे यांचा विजय निश्चित

भाजपा जेष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास

विरोधकांवरही केला जोरदार प्रहार

मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. अर्थ व्यवस्थेत पाचव्या क्रमांकवर आपला देश आहे. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे लोकप्रिय सरकार लोककल्याणकारी राज्य बनवण्यासाठी कार्यरत आहे. जनतेच्या पाठिंब्यावर महायुतीचे सरकार 160 पेक्षा जास्त जागी विजयी होत पुन्हा येणार हे निश्चित आहे. यात मालवण कुडाळ मतदारसंघातून जनतेच्या सेवेत सातत्याने असणारे महायुतीचे उमेदवार निलेश राणे 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांवर खा. नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. विरोधकांनी काय केले. यांचे विकासात योगदान काय? केवळ टीका करणे हेच यांचे काम आहे. मात्र आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हजारा मधून 2 लाख पेक्षा पुढे गेले. यापेक्षा जिल्ह्याची, जनतेची प्रगती मला करायची आहे. माझ्या कोकणी जनतेचे ऋण फेडायचे आहेत. नितेश, निलेश जनतेत राहून करत असलेले काम वडील म्हणून मला अभिमान वाटावे असे आहे. असे सांगत त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच महायुती म्हणून एकसंघ काम सुरु आहे. आजचा भाजपा मेळावाही निलेश राणे यांचा विजय निश्चित करणारा उत्स्फूर्त आहे. असेही खा. नारायण राणे यांनी सांगितले.

आमचे सरकार जनतेत राहून काम करते. आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षात फक्त दोन तास मंत्रालयात आले. येथील आमदारही दहा वर्षात पुर्ण अपयशी ठरला. बस स्टॅन्डवर शौचालय नाही. ही येथील परिस्थिती आहे. आता जनतेने निर्धार केला आहे. पुन्हा महायुती सरकार येणार. येथील आमदार निलेश राणे असणार असे खा. नारायण राणे म्हणले.

मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी भाजपा पदाधिकारी नेते जयंत जाधव, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विधानसभा समन्वयक बाबा परब, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, संतोष गांवकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, राजन वराडकर, पंकज सादये, अजिंक्य पाताडे, दाजी सावजी, मंगेश गांवकर, भाजपा महिलाजिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरोज परब, रश्मी लुडबे, तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, अन्वेषा आचरेकर, पुजा करलकर, केदार झाड, सरपंच पूनम वाटेगांवकर, पुजा सरकारे, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, राज कांदाळकर यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपास्थित होते.

यावेळी विलास हडकर, जयंत जाधव, बाबा मोंडकर, धोंडी चिंदरकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विचार मांडले. मेळाव्याच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित झाला असा विश्वास व्यक्त केला.

rapan bottom