Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

कुडाळ मधून ८ जणांनी केले ११ अर्ज दाखल; उद्या छाननी

कुडाळ मधून ८ जणांनी केले ११ अर्ज दाखल; उद्या छाननी

निलेश जोशी | कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात ८ जणांकडून ११ अर्ज दाखल झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैभव विजय नाईक यांनी ३ तर शिवसेना पक्षाकडून निलेश नारायण राणे यांनी दोन अर्ज भरले आहेत.
दि. २२ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. त्यानंतर कुडाळ मतदार संघात पहिले काही दिवस कोणी अर्जच दाखल केला नव्हता. २४ ऑक्टोबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव विजय नाईक यांनी या मतदार संघातून पहिला अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेनेचे निलेश नारायण राणे यांनी २८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला. वैभव विजय नाईक यांनी एकूण तीन अर्ज तर निलेश नारायण राणे यांनी एकूण दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याशिवाय वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
त्या व्यतिरिक्त कुडाळ मालवण मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने रवींद्र हरिश्चंद्र कसालकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सौ. उज्वला विजय येळावीकर, महाराष्ट्र स्वराज पक्षाच्या वतीने अनंतरज नंदकिशोर पाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष म्हणून सौ. स्नेहा वैभव नाईक यांच्यासह वैभव जयराम नाईक आणि प्रशांत नामदेव सावंत यांनी अर्ज दाखल केला. कुडाळ मालवण मतदार संघातून ८ जणांनी एकूण ११ अर्ज दाखल केले आहेत. उद्या या अर्जाची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेम्बर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

rapan bottom