मधुरा चोपडेकर यांची शिवसेना महिला उपतालुका पदी नियुक्ती
हेमंत बांदेकर, देवेंद्र कासवकर शाखा प्रमुख तर गोपाळ चोपडेकर देवबाग शिवसेना गाव प्रमुख पदी नियुक्ती
शानू वालावलकर | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी मालवणातील शिवसेना पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या.
देवबाग येथील मधुरा चोपडेकर यांची शिवसेना महिला उप तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तर देवबाग बुथ ११६ शाखा प्रमुख पदी हेमंत बांदेकर, बुथ ११५ शाखा प्रमुख पदी देवेंद्र कासवकर तर देवबाग येथील गोपाळ चोपडेकर शिवसेना देवबाग गाव प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात येत आहे.
वंदनीय हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

