Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कार्यसम्राट आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेना मजबूत !

कार्यसम्राट आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेना मजबूत !

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी विकासनिधी

मालवणात शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांचे कार्यतत्पर आणि आश्वासक नेतृत्व तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहेत. आमदार निलेश राणे यांनी विकासनिधीचा धडाका लावला असून त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन मालवण कुडाळ तालुक्यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत मोठया संख्येने पक्ष प्रवेश होत आहेत. कार्यसम्राट आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेना अधिक मजबूत केली जाईल. असे शिवसेना पदाधिकारी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी यांची बैठक महायुती आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. त्यानंतर शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजा गावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे तसेच जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी भुमिका मांडली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा संघटक अंजना सामंत, जिल्हा उपाध्यक्ष कविता मोंडकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, शहर संघटक राजू बिडये, राजन परुळेकर, अभय कदम, दत्तात्रय केळूसकर, आबा शिरसेकर, शिवाजी केळुसकर, बाळा जाधव, गीता नाटेकर, मार्टिन फर्नांडिस, संदीप भोजने, प्रदीप मोर्जे, निषय पालेकर, लुद्दीन फर्नांडिस, विलास मुणगेकर, आनंद खवणेकर, भाई मांजरेकर यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नीलेश राणे यांनी आक्रमकपणे विधानसभेत आपल्या पहिल्या भाषणात मच्छीमारांचा प्रश्न उपस्थित केला आहे. मच्छिमाराना न्याय मिळवून देत आहेत. किनारपट्टीवरील धूपप्रतिबंधक बंधारे पूर्ण होण्यासाठी त्यांनी मोठा निधी आणला. मच्छीमारांचे प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राणे साहेबांच्या मारगदर्शनात सोडवण्यासाठी तसेच मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील. असे राजा गांवकर म्हणाले.

कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी आपल्या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नीलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत. आपल्याकडे उपजिल्हाप्रमुख पद आणि कणकवली मतदार संघ जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिवसैनिकांना एकत्रित करत संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे बबन शिंदे यांनी सांगितले.

मालवण शहरातील सर्व विभागातून पदाधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. शहरातील सर्वच्या सर्व प्रभागात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले आहे. शिवसेना आमदार नीलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येत आहेत. असेही दिपक पाटकर म्हणाले.

आमदार निलेश राणे म्हणजे तात्काळ रिजल्ट : महेश कांदळगांवकर

शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर म्हणाले आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात जोमाने वाढत आहे. गावागावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आकर्षीत होत आहेत. कोट्यावधी रूपयांचा निधी आमदार निलेश राणे आणण्यात यशस्वी झाले आहेत. विधानसभेतील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे पाहून सर्वसामान्य जनता अधिक आकर्षित झाली आहे. आमदार असावा तर असा आमचे प्रश्न मांडून ते सोडवणारा. अश्याच भावना जनता व्यक्त करतं आहे. सोबतच होत असलेल्या विकासकामांमुळे मतदार संघ विकासप्रक्रीयेत पुढे जात आहे. असे महेश कांदळगावकर म्हणाले.

फोटो : पत्रकार परिषदेत उपस्थित शिवसेना पदाधिकारी. (अमित खोत, मालवण)

rapan bottom