श्रोत्यांनी लाभ घ्यावा...
शानू वालावलकर | मालवण : वायरी रेवंडकरवाडी येथील हनुमान मंदिर येथे श्रावण शनिवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सायंकाळी 7 वा. बुवा भालचंद्र केळुसकर यांचे भजन होणार आहे. तर चौथा शनिवारी प्रभुदास आजगांवकर यांचे कीर्तन होणार आहे. श्रोत्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अध्यक्ष भाई मांजरेकर आणि रेवंडकरवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

