Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

भव्य रिल मेकींग स्पर्धा…

भव्य रिल मेकींग स्पर्धा…

सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाचे आयोजन

पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी 'श्रावण पर्यटन पर्वणी' विषय

मालवण | प्रतिनिधी : सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या वतीने पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रावण- पर्यटन पर्वणी अर्थात मालवणातील श्रावण या विषयास अनुसरून भव्य रिल मेकींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी रिलची मर्यादा कमाल ९० सेकंद (दिड मिनीट) आहे. मालवण तालुक्याच्या पावसाळी पर्यटनाशी निगडीत कोणत्याही विषयाचे रिल बनवू शकता. (उदा. श्रावणातील उत्सव, निसर्ग, पशुपक्षी, किटक, समुद्र, ट्रेक, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व्यापार किंवा अन्य काहीही.) रिलच्या संवादात किंवा चित्रिकरणात पार्शभूमीवर सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ असा उल्लेख असणे अनिवार्य आहे. स्पर्धकांनी
malvan_vyapari_sangh या इन्स्टापेजवर आपले रिल २३ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत कोलॅब करणे आवश्यक आहे. कोलॅब केलेले रिल स्पर्धेत स्विकारायचे किंवा नाही याचे अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. कोलॅब केलेले रिल आयोजकांनी स्विकारल्या नंतरच या स्पर्धेसाठी स्पर्धकाचा प्रवेश निश्चित होईल. अश्लिल किंवा असंवेदनशील रिल स्विकारले जाणार नाहीत. फॉलोअर्स, लाईक्स, कॉमेंट्स याला अंतिम निकालात फक्त ५ टक्के भारमान (वेटेज) देण्यात येईल. रिल मध्ये दिलेला विषय कशाप्रकारे मांडला आहे, किती परिणामकारकरित्या मांडला आहे व किती कलात्मक परिणाम साधला आहे याला अंतिम मुल्यांकनात अधिकचे भारमान (वेटेज) असेल.

विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव

स्पर्धेतील विजेत्यास अनुक्रमे १० हजार रुपये, सन्मानचिन्ह, ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पाच क्रमांकांना प्रत्येकी १ हजार रुपये, सन्मानचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेबद्दल महत्वाचे…

स्पर्धेचे परिक्षण मंडळ स्वतंत्र असेल व त्यात आयोजकांचा कोणीही प्रतिनिधी असणार नाही. परिक्षक मंडळाने दिलेला निर्णय अंतिम असेल व त्याबद्दल कोणतीही तक्रार मान्य केली जाणार नाही. अधिक माहितीसाठी हर्षल बांदेकर- ९४०४४४२९५५, लारा मयेकर- ९४२३२१५४४४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom