Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

संत राऊळ महाराज महाविद्यालयमध्ये मानवी तस्करी विरोधीदिन साजरा

संत राऊळ महाराज महाविद्यालयमध्ये मानवी तस्करी विरोधीदिन साजरा

लघुपट प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे द गार्डियन या लघुपटाचे प्रदर्शन व चर्चा असा अभिनव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या. महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू आसोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. सुरवसे म्हणाल्या की, मानवी तस्करी विरोधी दिन दिनानिमित्त लघुपटाद्वारे हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. मानवी तस्करी छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत असते. त्याला प्रामुख्याने स्त्रिया बळी पडतात. त्यांचे अनेक प्रकारचे शोषण होते. शिवाय मानवी तस्करी मानवी अवयवांच्या चोरीसाठीही होत असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांबाबत आजच्या तरुण पिढीने सतर्क राहणे गरजेचे आहे.
उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने सुचिता मांजरेकर हिने अशा कार्यक्रमांची आवश्यकता कशी आहे याविषयी मत व्यक्त केले.
यावेळी कॅ.डॉ.एस. टी. आवटे, डॉ.व्ही.जी. भास्कर, डॉ. बी.ए.तुपेरे, डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा.अनुराधा गावडे, प्रा.स्वप्नजा चांदेकर आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

rapan bottom